दुष्काळाचा सर्वात मोठा फटका महिलांना - डॉ.शशिकांत अहंकारी

Update: 2019-05-06 14:07 GMT

दुष्काळामध्ये सर्वात जास्त पीडित वर्ग कोणता? याविषयी उस्मानाबाद जिल्ह्यातील हॅलो फाउंडेशने अभ्यास केला असता, त्यांना महिलांना याचा सर्वात जास्त फटका बसत असल्याचं समोर आलं आहे. गावांमध्ये राहणाऱ्या महिला साधारणपणे शेतात काम करणाऱ्या असतात. मात्र , दुष्काळामुळे गावाजवळची शेती उध्वस्त झाली आहे.

त्यामुळे त्यांना हाताला काम नसते. लोकांना गावापासून दूर जाऊन काम करणे कठीण होतं. त्यातच एकल महिलांना याचा सर्वात मोठा फटका बसतो. कारण त्यांना घरात मुलंही सांभाळायची असतात आणि कामही करायचं असतं. त्यामुळे अशा एकल महिलांसमोर रोजगारांचा प्रश्न निर्माण होतो. अशा महिलांना मदत करण्यासाठी हॅलो फाउंडेशचे संस्थापक डॉ.शशिकांत अहंकारी यांनी या महिलांना मदतीचा हात दिला आहे. पाहा काय आहे ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या

Full View

Similar News