डॉ. सुजय विखेंच्या अडचणी वाढणार, की कमी होणार?

Update: 2019-03-29 07:16 GMT

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने भाजपकडून उमेदवारी घेतल्यानं राज्यात चर्चेत आलेल्या अहमदनगर दक्षिण मतदारसंघात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकिट कापल्यानंतर आज नाराज झालेल्या गांधी यांची भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांची बंद दाराआड भेट घेतली. डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी भाजप खासदार दिलीप गांधी हे मात्र उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली. अखेर आज खुद्द सुजय विखे पाटील यांनीच दिलीप गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

डॉ. सुजय विखे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे जरी सांगितले असले तरी ही राजकीय भेट असल्याचं कोणीही नाकारु शकत नाही.दरम्यान बुधवारी रात्री साधारण साडेदहा वाजता कॉंग्रेसचे स्टार प्रचारक व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. उभय नेत्यांमध्ये जवळ जवळ 2 तास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर ही चर्चा सकारात्मक झाल्याचे दिलीप गांधी यांनी सांगितले होते. दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी बैठक घेऊन आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. पण त्याच बैठकीमध्ये गांधी यांनी मी पक्षाचेच काम करणार असे जाहीर करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, असं म्हणत बंडखोरी करणार नाही हे स्पष्ट केले होते.

त्यानंतर आज स्वत: डॉ. सुजय विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतल्यानं सुरेंद्र गांधी निवडणुकात उतरण्याचा निर्णय मागे घेणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Similar News