डीजेचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करताय... तर नक्की वाचा:

Update: 2018-09-14 09:50 GMT

तुम्ही जर डीजे वाजवण्याचे मेसेज सोशल मीडियावर पाठवत असाल तर, तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. होय, सोशल मीडियावर गणेशोत्सव मिरवणुकीत डी जे वाजवून दणदणाट निर्माण करण्याचे आवाहन करणाऱ्या करणार्‍या मुंबईतील घोरपडीतील ८ मंडळांच्या अध्यक्षांवर मुंढवा पोलिसांनी कारवाई केली आहे. या आठही मंडळावर गणेश प्रतिष्ठापनेच्या एक दिवस आधी या मंडळांच्या प्रतिनिधींना ताब्यात घेऊन पोलिसांनी सीआरपीसी १५१(१) व १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

का झाली कारवाई?

• मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या घोरपडी गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन पोलिसांनी या गणेश मंडळाना सूचना केल्या होत्या.

• गणेश मुर्ती प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूकीवेळी २ टॉप व २ बेस साऊंड सिस्टीम वापरावी.

• ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी ध्वनी प्रदुषण नियम २००० चे उल्लंघन केले जाणार नाही यासाठी सुचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले होते.

• सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीसाही देण्यात आल्या होत्या.

या गणेश मंडळांनी ’घोरपडी गाव भव्य मिरवणूक, हेला म्हणतात घोरपडी गावचा राडा, देखते हैं किसमे है कितना दम आता राडा होणार’ अशा मजकुराचा व गणेश मुर्ती स्थापनेकरता अंबिका डिजिटल, त्रिमुर्ती डिजिटल, सनयोग डिजिटल, एम. व्ही नाईन, रणजित ऑडीओ, ओमकार डिजिटल, आदी डिजे वाद्य चालकांची नावे असलेला फोटो व्हाटसअपवर व्हायरल केला होता. तर आम्ही डिजे लावणारच, कायद्याला घाबरत नाही असे कळत नकळत दाखवून दिल्याने पोलिसांनी संबंधित मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर कारवाई केली.

दरम्यान या कारवाईमुळे आता राज्यभरातील गणपती मंडळांना देखील एक चांगलाच धडा मिळाला आहे. नेटीझन्सने जर अशा प्रकारचा मजकूर सोशल माध्यमांवर जर व्हायरल केला तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डीजेचा आवाज नाहीतर डीजेच्या दनदनाटाचा संदेश देखील तुम्हाला पोलिसांची पायरी चढायला भाग पाडू शकतो.

Similar News