जी-२० शिखर संमेलनात मोदी आणि ट्रम्प यांची महत्वाच्या मुद्यांवर चर्चा

Update: 2019-06-28 06:02 GMT

जपानमधील ओसाका येथील जी-२० शिखर संमेलनात नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी व्यापार,संरक्षण,५जी कम्युनिकेशन्स नेटवर्क अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

ट्रम्प यांनी भावना व्यक्त करताना म्हणाले की भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक चांगले बनले असून या दोन्ही देशांदरम्यानची मैत्री आम्ही एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत. मी आणि मोदी चांगले मित्र बनलो आहोत. दोन्ही देश इतके जवळ कधीच आलेले नव्हते. आम्ही लष्करासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र येऊन काम करू. या परिषदेत आम्ही भारताशी व्यापारावर चर्चा करणार आहोत, असे ट्रम्प यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी ट्रम्प यांचे आभार मानत म्हणाले, 'आम्ही लोकशाही आणि शांततेसाठी कटिबद्ध आहोत. 'सबका साथ, सबका विश्वास' हा आमचा मंत्र आहे. आम्ही मेकइम इंडिया या मंत्रासह पुढे जात आहोत. आपण भारताप्रति प्रेम व्यक्त केल्याबद्दल मी आपला आभारी आहे. दोन देशांदरम्यान ४ प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यात ईराण, ५जी, संरक्षण, द्विपक्षीय संबंध या विषयांचा समावेश आहे'.

Similar News