सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनो होत नाही का? संतप्त सफाई कर्मचाऱ्यांचा सरकारला सवाल

Update: 2020-03-18 16:49 GMT

जगात कोरोनो व्हायरसचा उद्रेक झाला असून भारतातही या रोगाने प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या ही 42 पर्यंत पोहोचली आहे. सरकार आणि आरोग्य सेवा ही साथ जास्त पसरू नये म्हणून प्रयत्न करीत आहेत. मात्र, हे सर्व करत असताना शहर आणि गावच्या स्वच्छतेचा आणि सफाईची जबाबदारी ज्या महापालिका, नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यावर आहे. त्यांच्याकडे मात्र, सरकार चे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

शहर, वस्ती, रस्ते आणि गल्ली बोळ साफ करणारे सफाई कर्मचारी तोंडाला मास्क न लावता हात स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर न वापरता काम करत आहेत. अशा अवस्थेत हे सर्व कर्मचारी काम करत आहेत. मॅक्समहाराष्ट्र ने या सफाई कर्मचाऱ्यांशी बातचित केली असता हे धक्कादायक वास्तव समोर आलं...

Full View

Similar News