'तो' फोटोग्राफर कोण?

Update: 2019-07-26 15:09 GMT

चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्या बैठकीचा एक फोटो व्हायरल करण्यात आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर व्हायरल झालेल्या या फोटोनंतर अशा गुप्त बैठकांचे फोटो काढणारा तो फोटोग्राफर कोण याची चर्चा रंगली आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारे छुप्या पद्धतीने फोटोग्राफी करण्याचा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाही. गोपीनाथ मुंडे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांना भेटल्याचे व्हिडीयो ही भाजपाच्या एका नेत्याच्या सांगण्यामुळेच लीक झाल्याचा इतिहास आहे.

बैठकांना आलेल्या इतर पक्षांच्या आमदार आणि नेत्यांची माहिती आणि फोटो लीक करण्यामागे विरोधी पक्षांवर दबाव टाकण्याचा हेतू असू शकतो किंवा या नेत्यांचं त्यांच्या त्यांच्या पक्षातील वजन कमी करण्याचा प्रयत्न. सध्या तरी तो फोटोग्राफर कोण यावरच सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Similar News