डोंगरीत इमारत कोसळली : ४० जण अडकल्याची शक्यता

Update: 2019-07-16 07:35 GMT

मुंबईतील डोंगरी भागात अब्दुल रहमान शाह दर्ग्याच्या मागे निशाण पाड्यात पाच मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी NDRF चे पथक दाखल झाले असुन बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या इमारतीत साधारण १० ते १५ कुटुंब राहत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

Full View

Similar News