दिव्यांग दाम्पत्याच्या कन्येचे अपहरण तक्रारीनंतरही पोलीस प्रशासन उदासीन

Update: 2022-01-11 03:29 GMT

दिव्यांगांच्या बाबतीत जास्त सामाजिक आणि पोलीस प्रशासनाचा उदासीनपणा पुन्हा एकदा पुढे आला आहे पुणे शहरात राहणाऱ्या नीता कुलकर्णी व प्रशांत कुलकर्णी या दृष्टीबाधित दाम्पत्याची बारा वर्षे जुई कुलकर्णी कन्या गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. यासंदर्भात या दाम्पत्याने पुण्याच्या विमान नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे मात्र गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले असताना सुद्धा पोलीस यंत्रणा निष्क्रिय असल्याचे चित्र आहे.

संबंधित दाम्पत्यांनी पोलिसांशी संपर्क केला असता तपास अधिकारी तपास सुरू आहे माझ्याकडे 100 केस आहेत मी एका केसमध्ये भाग घेऊ शकत नाही अशा पद्धतीचे उत्तर देत असल्याचा गंभीर आरोप या दाम्पत्याने केला आहे.  



 



 



 



 





एकीकडे दिव्यांगांसाठी केंद्र सरकारने 2016साली person with disability कायदा अस्तित्वात आणला त्याची राज्यभरात अनेक ठिकाणी अंमलबजावणी होत नाही तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेचा हा निष्क्रिय पणा यामुळे पुणे शहराच्या पोलीस यंत्रणेवर सवाल उपस्थित केला जात आहे?

आम्ही यासंदर्भात राष्ट्रीय दृष्टी कल्याण संस्थेचे सचिव संतोष राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. संतोष राऊत म्हणाले, केंद्र सरकारच्या वतीने अस्तित्वात आलेल्या 2016 च्या person with disability कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.यामुळे दिव्यांगांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे संबंधित प्रकरणात सामाजिक संस्थेचा प्रमुख या नात्याने मी स्वतः पोलीस आयुक्तांना भेटायला गेलो असता आम्हाला कुठल्याही प्रकारची भेट देण्यात आली नाही.मग आम्ही अपंग कल्याण उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात कल्पना दिली.मात्र माझे पोलीस आयुक्तांना आव्हान आहे त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून आम्हाला कार्य करून दाखवावे ? शिवाय संबंधित तपास अधिकारी आमच्यावर कारवाई करावी अशी मागणी संतोष राऊत यांनी केली आहे.

Similar News