वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या बाहेर कर्मचाऱ्यांचे उपोषण

Update: 2019-09-19 13:44 GMT

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी अनेक मागण्यांसाठी सध्या उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. तरीही अनेक कर्मचारी उपोषण करत असतानाही कारखाना प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये सध्या संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे मागण्या?

कारखाना प्रशासनाने कर्मचार्यांचची 2018 पासून अंशदानाची रक्कम भरलेली नाही. मागील 13 महिन्यांपासून या कर्मचार्यांशना पगार मिळालेला नाही. तसंच 18 महिन्यांपासून त्यांचा पी.एफ. देखील जमा करण्यात आलेला नाही. आणि 2 वर्षांपासून रेटेन्शन अलाऊंस मिळालेला नसल्याचं या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

Full View

Similar News