बीडीडी चं अस्तित्व धोक्यात - BDD Chawl

Update: 2019-03-29 07:28 GMT

मुंबईसारख्या महानगरामध्येही इमारतींबरोबर बीडीडी सारख्या चाळी शेवटची घटका मोजत आहेत. सरकारनं चाळीतल्या रहिवाशांचं जनमत मिळवण्यासाठी पुनर्वसनाची आश्वासनं दिली. मात्र ती आश्वासनं आजतागत पूर्ण झालीच नाहीत. या बीडीडी चाळीनं अनेक लढे पाहिले हे ऐतिहासिक कल्चरच संपतंय का, अशी भीतीच आज बीडीडी चाळीतील लोकांना वाटू लागलीय. त्याच बरोबर मराठी टक्का कमी होण्याचा धोका सुद्धा प्रकर्षाने जाणवत आहे.

बीडीडी चाळीतील लोकं जीव मुठीत धरून राहतात. राज्य सरकारनं बीडीडी चाळीच्या पुनर्वसन योजनेचा नारळ देखील फोडला. मात्र, प्रत्यक्ष पुनर्वसनाची हालचाल सुरू झालीच नाही. स्थानिकांना अजूनही संक्रमण करार काय आहे, हे माहित नाही. लोकांना सरकारनं अजूनही याबाबत विश्वासात घेतलेलं नाही. बीडीडी चाळीतील लोकांमध्ये राजकीय नेते मुंबईतून आम्हांला बाहेर काढू पाहतायेत, अशी भीती निर्माण झाली आहे.

https://youtu.be/ydkl6shqcgQ

बीडीडी चाळींचा विकास होत नसून विकासाच्या नावावर हा परिसर भकास होत आहे, असं चाळीतील लोकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर बीडीडी पुनर्विकासाच्या कामांमध्ये अजूनही पारदर्शकता नाही, असा आरोपही स्थानिक रहिवाशांनी केलाय. बीडीडी चाळींच्या विकासाच्या नावावर प्रकल्पग्रस्तांवर दडपशाही का होते, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. बीडीडीचा आदर्श विकास नसून विकासाच्या नावाखाली घोटाळा केला जात आहे असा सरळ आरोप बीडीडी चाळीतील रहिवाशांनी केला आहे. हा विकास आहे तर या बीडीडीच्या पुनर्वसनात पक्षभेद आणि जातीभेद आणला गेला आहे असं म्हणणं स्थानिकांचा आहे. बीडीडीमधून मूळ रहिवाशांना उचलबांगडीचीही भीती वाटू लागलीय. त्यामुळे ऐतिहासिक बीडीडीच्या समस्याही ऐतिहासिकच झाल्या आहेत.

Similar News