#Balakot  : पेलोड म्हणजे काय आणि मिराज विमानाचा प्रभाव

Update: 2019-02-26 12:00 GMT

पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय विमानांनी घुसून दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाचे तळ उध्वस्त केले. हवाई दलाच्या विमानांनी या तळांवर पेलोड सोडले होते, त्यामुळंच ही तळं उध्वस्त झाल्याचा दावा भारतानं केला आहे. त्यामुळं हे पेलोड म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता.

पेलोड म्हणजे...

पेलोड याचा अर्थ विस्फोटक शक्ती असा आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर कोणतेही मिसाइल, विमान, रॉकेट किंवा स्फोटकं वाहून आणण्याची क्षमता पेलोडमध्ये असते.

मिराज विमानची वैशिष्टयं

१ मिराज 2000 फ्रेंच बनावटीचं अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.

२ दसॉल्ट एविएशन या फ्रान्सच्या कंपनीनंच मिराज २००० हे विमान बनवलेलं आहे...हीच कंपनी राफेल विमानही बनवणार आहे...

३ मिराज या 2000 विमानांची लांबी 47 फूट आणि वजन 7,500 किलो आहे.

४ मिराज - 2000 ची कमाल वेग 2,000 किलोमीटर प्रति तास आहे.

५ हे विमान प्रतितास 2336 कि.मी. क्षमतेच्या वेगानं उडू शकते.

६ ८० च्या दशकात प्रथमच 36 मिराज 2000 ची खरेदी केली गेली होती.

७ कारगिल युद्धात देखील मिराज विमानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

८ हे विमान हवेमध्येही शत्रूशी लढू शकते.

 

Similar News