बाबासाहेबांनी नव्हे तर 'भीमा कोरेगाव विजय दिन' हाजी मस्ताननं सुरु केला : एकबोटे

Update: 2018-12-02 16:56 GMT

भीमा कोरेगाव प्रकरणात आरोपी असलेला मिलिंद एकबोटेंनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भीमा कोरेगाव विजय दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केला नसून, अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याने सुरु केला होता, असा दावा कोर्टात सादर केलेला प्रतिज्ञापत्रात केला आहे.

दरम्यान १ जानेवारीला भीमा कोरेगावच्या लढाईला 201 वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर बोटे यांनी वक्तव्य केल्यानं सामाजिक वातावरण गढूळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास ?

1 जानेवारी 1818 रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये हे युद्ध झालं. त्यावेळी पुण्यावर ब्रिटिशांची सत्ता होती. पुणे म्हणजे पेशव्यांचा बालेकिल्ला होता. तो परत मिळवण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फौज फाट्यासह पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले. याची माहिती मिळताच इंग्रजांनीही पेशव्यांशी दोन हात करत महार रेंजिमेंटच्या मदतीने पेशव्यांचा पराभव केला. हा लढाई जिंकण्याचा दिवस म्हणजे 1 जानेवारी 1818 ची पहाट होती. या लढाईत महार सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळेच विजय मिळाला. त्या विजयाचं प्रतिक म्हणून इंग्रजांनी भीमा-कोरेगावमध्ये विजय स्तंभ उभारला आणि त्यावर युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली.

त्यानंतर एक जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावला विजय स्तंभाला भेट दिली. तेव्हापासून आजतागायत पर्यंत या ठिकाणी नागरिक 1 जानेवारीला भेट देत असतात.

 

 

 

 

 

 

 

 

 

Similar News