अॅक्सीडेन्ट करणारे प्राईम मिनिस्टर' असाही चित्रपट "मोदींवर" निघू शकतो- सचिन सावंत

Update: 2018-12-28 08:54 GMT

मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत देशाने आर्थिक प्रगतीची सर्वोच्च शिखर गाठले. पंतप्रधान मोदींनी मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचे अॅक्सीडेन्ट केले आहे. त्यामुळे ' अॅक्सीडेन्ट करणारे प्राईम मिनिस्टर' असा चित्रपट मोदींवर बनवावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पालघर येथे पत्रकार परिषेदेत दिली.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात मनमोहन सिंग यांच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, त्यांच्या कारकीर्दीत देशाने आर्थिक प्रगतीची सर्वोच्च शिखर गाठले. पंतप्रधान मोदींनी मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचे अॅक्सीडेन्ट केले आहे. त्यामुळे ' अॅक्सीडेन्ट करणारे प्राईम मिनिस्टर' असा चित्रपट मोदींवर बनवावा, असे सचिन सावंत म्हणाले.

सावंत पुढे म्हणाले, गेल्या ४ वर्षात भाजप सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार म्हणून समोर आले आहेत. त्यांच्या उदयानंतर देशातील राजकीय संवाद अतिशय खालच्या पातळीवर गेला आहे. स्वत:च्या कर्तृत्वाचा आलेख वाढत नाही, त्यासाठी दुसऱ्याचे कर्तृत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न सुरू आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थिक आव्हानांना तोंड देत, सजगतेने आर्थिक संकटातून मार्ग काढत मागच्या १० वर्षात देशाला सुबत्तेच्या मार्गावर आणले आहे.

Similar News