आण्णा हजारेंना सुरेश जैन यांचे वावडे का?

Update: 2018-09-14 12:03 GMT

आण्णा हजारे येत्या २ ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार असल्याने सरकारच्या वतीने त्यांच्याशी चर्चा करुन आण्णाचे मन वळवण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी आज आण्णांची भेट घेतली. यावेळी आण्णा आणि महाजन यांच्या दरम्यान बंद दाराआड चर्चा झाल्याचे समजते. चर्चेदरम्यान गिरिष महाजन यांनी जळगाव महानगरपालिकेत सुरेश जैन यांचा पराभव केल्याने आण्णांनी महाजनांचे कौतुक केले आहे.

जैन यांचे नाव न घेता ‘महाजनांनी जळगावमध्ये आमच्या मित्राचा धुव्वा उडविला’ अशा शब्दांत अण्णांनी भावना व्यक्त करत सुरेश जैन यांना टोला लगावला तर महाजनांनी हसत हसत ‘अण्णा आम्ही एका दगडात दोन पक्षी मारले.’ असे म्हणत खडसेंना देखील टोला लगावला आहे.

सुरेश जैन विरुद्ध आण्णा हजारे काय आहे प्रकरण?

आण्णा आणि सुरेश जैन यांच्यात पूर्वी चांगलेच वाद झालेले आहेत. अक्षरश: दोघांनी एकमेकांविरोधात कोर्टात खटलेही दाखल केले आहेत. अशा सुरेश जैन यांचा महाजन यांनी पराभव केल्याने आण्णांना आपला आनंद लपवता आला नाही. त्यामुळे महाजन समोर येताच हजारे यांच्या तोंडून जैनांच्या पराभवाचा विषय बाहेर पडला. त्यानंतर महाजन यांना संधी मिळताच त्यांनी खडसे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

Similar News