ओला दुष्काळ : चारा नसल्यानं जनावरं विक्रीला

Update: 2019-11-20 01:30 GMT

मागील वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी आपली जनावरं कधी छावणीत तर कधी चारा विकत घेऊन संभाळली. माणसांप्रमाणे जनावरांना जीव लावला. त्यातच दुष्काळात काही भागात चारा असायचा. मिळेल त्या भावात शेतकरी हा चारा खरेदी करायचा. मात्र, सध्या राज्यात ओला दुष्काळ पडला आहे. ओल्या दुष्काळात सगळीकडे चारा खराब झाला आहे. अक्षरश: चारा सडला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत आला आहे.

हे ही वाचा

पीएमसी बँकेच्या खातेदाऱ्यांना एकनाथ गायकवाड यांनी दिला दिलासा..

शेतकऱ्याच्या घामाने पिकवलेलं अन्न धान्य फाटलेल्या पोत्यात…!

८ हजारात महिन्याचा खर्च निघत नाही, वर्ष कसं काढयाचं

परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेलं पीकं वाया गेली आहेत. पिकांबरोबर जनावरांचा चारा असलेली मका, घास, गन्नी गवत यासारखी पीकं हातातून निघून गेली आहेत. आता जनावरांना खाण्यासाठी चारा उपलब्ध नाही. म्हणून शेतकरी आपली जनावरं बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. त्यातच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना स्वत: च्या कुटुंबाला काय खाऊ घालावं? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे जनावरांसाठी शेतकरी चारा जास्तीच्या पैशाने विकत घेणं आता शक्य नाही.

त्यामुळं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांनी जनावरं विक्रीस काढली आहेत. मात्र, बाजारात आवक वाढल्यानं लाखांच्या बैल जोड़ीला हजाराची मागणी आहे.

चारा नसल्यानं आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेकड़ो शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली आहेत. मात्र योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे.

या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने शेतकऱ्यांशी बातचित केली. आणि त्याच्या समस्या जाणून घेतल्या पाहा काय म्हणाले शेतकरी...

Full View

Similar News