जमिनीच्या वादातून अब्दुल सत्तारांची दादागिरी?

Update: 2017-06-13 17:00 GMT

औरंगाबादच्या सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचा दादागिरी करणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. अब्दुल सत्तार यांच्या शेताच्या शेजारीच मुख्तार शेख सत्तार यांची जमीन आहे. आपली जमीन बळकावण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी ही दादागिरी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप मुख्तार यांनी केला आहे. या व्हिडीओत अब्दुल सत्तार अर्वाच्य भाषेत शिविगाळ करतांना दिसून येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे आमदार सत्तार यांच्याबरोबर यावेळी एक पोलीससुद्धा दिसत आहे. पीडित शेतकऱ्यानं याबाबत सिल्लोड पोलिसात तक्रार दिली आहे. पण, गुन्हा दाखल करण्यात पोलीस चालढकल करत असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यानं केला आहे.

दहीगाव शिवारात आमची दहा एकर जमीन आहे. सोमवारी आम्ही पेरणी करत असतांना अब्दुल सत्तार, त्यांचा नगराध्यक्ष मुलगा अब्दुल समीर, त्यांचे पीए आणि इतर गुंडांनी आम्हाला शिवगाळ आणि मारहाण केली. जर आमच्या वडीलांनी जमीन विकली असेल तर आमदारांनी त्याची कागदपत्र दाखवावीत – मुख्तार शेख सत्तार

पीडिताच्या वडिलांनी 21 वर्षांपूर्वी एका दलिताकडून ही जमीन विकत घेतली होती. ती त्यांच्या नावावर होत नाही हे लक्षात आलं. फेरफार करून त्यांनी नावं चढवली. पण, तहसिलदार आणि जिल्हाधिकऱ्यांनी त्यांच्याविरोधात निर्णय दिला. त्यामुळे त्यांनी दलित समाजाच्या सखाराम कल्याणकर यांना जमीन विकली. पण, वडिलांच्या मृत्यूनंतर आता त्यांची मुलं कल्याणकर यांना जमीन ताब्यात देण्यास तयार नाहीत. मुख्तार शेख सत्तार याने मशिदीत जाऊन जमीन विकली नाही असं कबुल करावं. मी कल्याणकरांचे पैसे भरून देण्यास तयार आहे. – अब्दुल सत्तार, आमदार, सिल्लोड

Similar News