परभणीत शेत नुकसान भरपाईसाठी आले बावन्न हजार अर्ज

Update: 2019-10-31 11:05 GMT

पंतप्रधान (Prime Ministe) पीकविमा (crop insurance) योजनेअंतर्गत पीक संरक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील बावन्न हजाराहुन अधिक शेतकऱ्यांनी विमा परतावा मिळण्यासाठी मंगळवार पर्यंतबावन्न हजारांवर अर्ज़ केल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

अवकाळी पाऊस, कापणी पश्चात नुकसान आदी बाबींमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची तरतूद आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, पिकांचे अतिवृष्टिमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने विमा कंपनीतर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीक नुकसाणीची माहिती अर्जांद्वारे संकलित करण्यात योत आहे. मंडल निहाय शेतकऱ्यांचे अर्ज़ घेतले जोत असुन विमा भरपाईसाठी तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी अर्ज करत आहेत. प्रत्यक्ष शेतावर येवून पंचनाम्यासोबतच अर्ज भरून घ्यावेत अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.

Full View

Similar News