मुंबईतील ५०० चौ.फुटांची घरं करमुक्त

Update: 2019-03-08 14:11 GMT

शिवसेनेच्या दबावापुढे राज्य सरकारला निर्णय घ्यावे लागत असल्याचं आता स्पष्ट होत चाललंय. शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील ५०० चौरस फुटांची घरं करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना आता मालमत्ता करातून सूट मिळणार आहे. शिवसेनेनं गेल्या कित्येक दिवसांपासून सातत्यानं ही मागणी लावून धरली होती.

मुंबईतील ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करावा अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली होती. तसेच याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेनेने ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने मुंबी महापालिकेत याबाबतचा प्रस्तावही मंजूर केला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारकडेही पाठवण्यात आला होता. शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय घेण्यात आला.

Similar News