लंडनच्या विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर तीन बॉम्ब सापडले

Update: 2019-03-05 17:52 GMT

लंडन आणि हेथ्रो शहरातील एअरपोर्ट आणि वॉटरलू रेल्वे स्टेशन अशा तीन ठिकाणी छोटे बॉम्ब सापडले आहेत. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर ब्रिटनच्या दहशतवाद विरोधी पथकानं ते बॉम्ब ताब्यात घेतले आहेत. जेव्हा हे बॉम्ब ताब्यात घेतले तेव्हा ते आगसदृश्य दिसत होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या बॉम्बमुळं कुणीही जखमी झालं नसून कुठल्याही प्रकारची सेवा प्रभावित झालेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या घटनेची पाळमुळं शोधली जात असून यामागच्या उद्देशाचाही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Similar News