महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ - Jitendra Awhad

Update: 2024-02-29 04:03 GMT

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अशी लढत यंदा राज्यात पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र आले होते. दरम्यान यावेळी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यावर चर्चा झाली. यासंदर्भात महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे जागा वाटपासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन लवकर जागावाटपा संदर्भात माहिती देतील.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण असेल असं विचारण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी यावर उत्तर देताना म्हणाले की " महाविकास आघाडीत शिवसेना हा आमचा मोठा भाऊ असेल असं म्हणाले आहेत

दरम्यान हाच प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारण्यात आला होता यावेळी पटोले यांनी महाविकास आघाडीच आमचा मोठा भाऊ असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण ? यावर राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.

Tags:    

Similar News