जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांनी सुनावले

Update: 2021-10-13 09:48 GMT

'मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे.', असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी काल (12 ऑक्टोबर) एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर आता फडणवीस यांच्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

आज शरद पवार यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला.

काय म्हटलं होते फडणवीस यांनी?

'पाटीलसाहेब आणि गणेश नाईक आहेत. तुमच्यासारखे नेते पाठिशी असल्याने मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचं नाही तो काय करतो हे महत्त्वाचं आहे.'

'गेले दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलेलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो आहे. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी आशीर्वाद घ्यायला इथेच येणार आहे''

असं विधान फडणवीस यांनी केलं होतं. यावर आज शरद पवार यांनी

मी ४ वेळा CM होतो पण आम्हाला कधी असं वाटलं नाही. सत्ता नसल्याच्या वेदना किती प्रखर आहेत ते दिसते.

असं म्हणत फडणवीस यांना पवार यांनी चांगलेच सुनावले.

Tags:    

Similar News