शरद पवार १६ ऑगस्टपासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर

Update: 2023-07-27 14:56 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी साताऱ्यातून महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवल्यातही सभा घेतली. मात्र, त्यानंतर अचानक त्यांनी पुढचा दौरा रद्द केला. मात्र, आता पुन्हा नव्यानं शरद पवार हे महाराष्ट्र दौरा करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आलीय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही संभाव्य दौऱ्याच्या बातमीला दुजोरा दिलाय.

जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यातच महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली होती. त्यांनी सातारा आणि नाशिकच्या येवल्यात सभा देखील घेतल्या. मात्र, त्यानंतर पावसाळ्यामुळं त्यांचा दौरा तात्पुरता थांबविण्यात आला होता. आता पुन्हा १६ ऑगस्टपासून शरद पवारांचा हा दौरा नव्यानं सुरू होणार असल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनीही दुजारो दिलाय. संसदेचं अधिवेशन आणि महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News