माझीच पतंग वाचवता वाचवता थकलो, भुजबळ असे का म्हणाले?

Update: 2022-01-15 12:02 GMT

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणी कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. पण आता सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे. तसेच हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच आफली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकचे पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी शनिवारी येवला येथे विविध विकास कामांचे उद्घाटन केले. तसेच येवल्याच्या पतंगोत्सवात सहभागी होत त्यांनी पतंगबाजीचा आनंद देखील लुटला.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरमात अंजली दमानिया पुन्हा न्यायालयात गेल्या आहेत, याबाबत विचारले असता भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली. याबाबत आपण एवढी काळजी करत नसून न्यायालयाने आम्हाला केस मधून डिसचार्ज केलं आहे, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पतंग उडवण्याचा आनंद लुटल्यानंतर पत्रकारांनी छगन भुजबळ यांना एक प्रश्न विचारला होता, अनेकांच्या पतंगी कापल्या गेल्या आहेत आता तुम्ही कोणाची पतंग कापणार असा प्रश्न भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की, "माझीच पतंग प्रत्येकजण कापण्यासाठी तयार असून मी कोणाच्या पतंग कापण्याचा धंदा सुद्धा करत नाही आणि माझ्याच पतंगीवर सगळ्यांचं लक्ष असतं, त्यामुळे मी माझी पतंग वाचवता वाचवता थकलो आहे, असे उत्तर भुजबळ यांनी दिली आहे. आता छगन भुजबळ यांची पतंग कापण्याचा प्रयत्न करणारे अनेक जण कोण अशी चर्चा देखील सुरू झाली आहे.

Full View

Similar News