वंचितचे सर्व आमदार निवडून दिल्यास वर्षभरात वेगळा विदर्भ केल्याशिवाय राहणार नाही- प्रकाश आंबेडकर
Washim - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज विदर्भाच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीवरुन पुन्हा एकदा तीव्र भूमिका घेतली. ते म्हणाले की, "वंचितचे सर्व आमदार निवडून दिल्यास वर्षभरात वेगळा विदर्भ करू." असं वक्तव्य त्यांनी वाशीम येथील पत्रकार परिषदेत केलं आहे.
आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना ते म्हणाले की, " धर्माचं राजकारणं संपलं आता समाजाचं राजकारणं सुरू झालंय देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे प्रतिनिधी आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत. या दोघांची असलेली भाषा ही वेगळी आहे. भाजप- शिंदेमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे.
आंबेडकर यांनी पुढे सांगितले की, "वेगळ्या विदर्भाचा ठराव सभागृहात मांडावा लागेल. ठरावाच्या बाजूने विदर्भातील आमदार उभे राहिले तरच वेगळा विदर्भ होईल. वंचितचे सर्व आमदार म्हणजे आता होणाऱ्या विधानसभा, लोकसभेला, हे तुम्ही निवडून द्या. वर्षभरात वेगळा विदर्भ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही." असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.