राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जेव्हा राजभवनात तुळस लावतात....

Update: 2021-07-16 15:22 GMT

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राजभवनात तुळशीचे रोपन केले. यात तुम्ही म्हणाल असं काय विशेष आहे. भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण निसर्ग व ऋतुचक्राशी जोडलेला आहे. केवळ आपल्या देशात वड, पिंपळ, आवळा आदी विविध वृक्षांची व पशुपक्षांची पूजा केली जाते, असे सांगून निसर्गरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले जातं.

महाराष्ट्राचे राज्यपाल उत्तराखंड चे आहे. उत्तराखंडचा लोकोत्सव असलेल्या 'हरेला पर्व' ला नुकतीच सुरुवात झाली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आपल्या निवासस्थानाबाहेर तुळशीचे रोप लावले.

यावेळी मूळच्या उत्तराखंड येथील लोकांच्या मुंबईतील संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांच्या डोक्यावर नवतृणांकुर अर्पण करून परस्परांना हरेला पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला भारत विकास परिषदेच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष महेश शर्मा, हिमालय पर्वतीय संघाचे अध्यक्ष चामूसिंह राणा, उद्योजक के एस पंवर, तुलसी फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर फुलोरीया, गढवाल भ्रातृ संघाचे उपाध्यक्ष दयाराम शाती, महेंद्र सिंह गोसाई, अमरजित मिश्र, अजय बोहरा, आदी उपस्थित होते..

Full View

Tags:    

Similar News