Anil Parab ED Notice: अनिल परब यांना ईडीची नोटीस, परब यांची पहिली प्रतिक्रिया

Update: 2021-08-29 15:54 GMT

परिवहन मंत्री अनिल परब यांना ED ची नोटीस आली आहे. या संदर्भात अनिल परब यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

"नोटीस मिळाली, मात्र त्यात कोणत्या प्रकरणाबाबत नोटीस आहे. याचा उल्लेख नाही. पण 31 तारखेला सकाळी 11 वाजता हजर राहायला सांगितलं आहे. मला आलेल्या ईडीच्या नोटीसला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. या संदर्भात मी कायदेशीर सल्ला घेईन. सूड बुद्धीने माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्या संदर्भात मी नंतर बोलेन.''

अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप अनिल परब यांच्यावर भाजपने केला होता. त्यांचा एक कथित व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यांच्या या व्हिडीओवर नारायण राणे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती.

मोदी मंत्रीमंडळाच्या विस्तारात मंत्री झालेल्या नेत्यांची जनआशिर्वाद यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

Tags:    

Similar News