मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी मी थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस

Update: 2022-03-13 10:26 GMT

फोन टॅपिंग संदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांनी घरी जाऊन चौकशी केली.फडणवीस यांच्या समर्थनात भाजपकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पोलिसांनी फडणवीस यांना सांगितले की तुम्ही पोलिस स्टेशनला येवू नका, आम्हीच तुमच्या घरी येतो, असे सांगितले होते. आज सकाळपासून फडणवीस यांची सुमारे दोन तास चैाकशी करण्यात आली.

मला जे प्रश्न पाठवले आणि जे प्रश्न विचारण्यात आले त्यात अंतर होत. ऑफिशियल सीक्रेट एक्टचा मी उल्लंघन केलं अशाप्रकारचे प्रश्न विचारण्यात आले.जेणे करुन मला आरोपी किंवा सहआरोपी बनवण्याचा प्रयत्न चौकशीतून झाला.मी जबाबदार नेत्याप्रमाणे वागलो.पोलिस बदल्यातील घोटाळा बाहेर काढला म्हणून हे सुरु आहे.राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याची कागदपत्रे त्यांनाच देता येत नाही.मी केद्रीय गृह सचिवांना ही कागदपत्रे सोपावली. अतिसंवेदनशील कागदपत्रे त्यांनाच देता येत नाही. मंत्री नवाब मलिक यांनी हा प्रकार समोर आणला. मग संवेदनशील कागदपत्रे मलिकांनी उघड केले असा दावा फडणवीसांनी केला.

मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी मी थांबणार नाही मी घोटाळे बाहेर काढणाकच, सरकारला यातून काही हाती लागणार नाही.त्यांचे मनसुबे यशस्वी होणार यशस्वी होणार नाहीत. असे फडणवीस म्हणाले ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, त्याला नक्कीच असे वाटेल की अशी नोटीस देणे योग्य नाही, असे ते म्हणाले

देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवला. डीसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला. मुंबई सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. पोलीस दुपारी 12 वाजता दाखल झाले. यानंतर तब्बल दोन तासानंतर हे पथक बंगल्याबाहेर पडलं आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरा बाहेर गर्दी केली होती.

Tags:    

Similar News