#गावगाड्याचे_इलेक्शन : शिवसेनेचा दे धक्का, चंद्रकांत पाटील यांच्या गावात फडकावला झेंडा

Update: 2021-01-18 07:27 GMT

राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच गावात धोबीपछाड मिळाला आहे. राज्यात होत असलेल्या सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये सुरूवातीला काही धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या मूळ गावी खानापुरात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

विशेष म्हणजे खानापुरात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. तर शिवसेना एका बाजूने स्वबळावर लढत होती. यात शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. गावातील नऊ पैकी ६ जागा शिवसेनेनं जिंकल्या आहेत. तर अवघ्या तीन जागांवर भाजपला समाधान मानावे लागले आहे.

Full View


Tags:    

Similar News