NIA च्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग आरोपी का नाही: नवाब मलिक

अंबानी स्फोटकं प्रकरणात NIA ने चार्जशीट दाखल केलं आहे. या सर्व प्रकरणानंतर अनिल देशमुख यांना आपला राजीनामा द्यावा लागला होता. ही चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Update: 2021-09-08 14:18 GMT

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आल्याचा मलिक यांनी केला आहे. परमवीरसिंह यांना वाचवण्यासाठी NIA ने त्यांना आश्वासित केले. त्यामुळे NIA च्या चार्जशीटमध्ये परमवीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

NIA ने जे चार्जशीट दाखल केले आहे त्यामध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी दिले होते. असं सायबर एक्स्पर्टने सांगितले असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितले.

NIA ने जी चार्जशीट दाखल केली आहे. त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत. त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आले नाही. एक्स्टॉरशनच्यासाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे याने केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असं आमचं मत नाही. बरंचसं काही यातून बाहेर येऊ शकत होतं. परंतु NIA ने तसा काही तपास केला नाही.

काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमवीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

Tags:    

Similar News