भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे कार्यकर्ते आमने-सामने..! नेमकं काय घडलं ?

Update: 2024-02-16 14:12 GMT

शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला होता. जाधवांच्या कार्यालयाबाहेर राणेंच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचा जंगी सत्कार करण्यात येणार होता. मात्र याच वेळी जाधव आणि राणे यांच्या कार्यकर्त्यांमाध्ये राडा झाला असून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीसांनी अश्रुधुरांच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला.


घडलेल्या प्रकाराबाबत भास्कर जाधव काय म्हणाले -


यावर आमदार भास्कर जाधव म्हणाले की, गुहागरमध्ये टिझर व्हायरल करून लोकांना उकसवण्याचा प्रयत्न केला होता. गुन्ह्याला माफी नाही, हिशोब चुकता करणार, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र आम्ही कुणाच्याही झेंड्याला अथवा बॅनरला हात लावायचा नाही, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यामूळे आमच्यापैकी कुणीही त्यांच्या झेंड्याला हात लावला नाही. हीत आमच्या गुहागरची संस्कृती असल्याचेही जाधव म्हणाले.

Tags:    

Similar News