आर्थिक मंदीवर सामान्य नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया...

Update: 2019-09-07 03:48 GMT

राज्यात दुष्काळ आणि पुराच्या आपत्तीसह देशातील मंदीच्या झळांचे कठीण आव्हान सरकारसमोर आहे. युती सरकारच्या पाच वर्षांच्या काळात राज्याचे महसूल उत्पन्न दोन लाख कोटी रुपयांवर पोहोचले असले, तरी सरकारच्या महसूली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महसूली जमा आणि महसुली खर्च यांचा ताळमेळ बसविण्याचे आव्हान सरकारसमोर आहे.

देशातील या आर्थिक परिस्थितीवर मॅक्समहाराष्ट्र ने सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला... काही लोक म्हणतात की मंदी वैगरे काहीच नाही आहे. तर काही म्हणतात अर्थव्यवस्था मंदी आहे पण ती काय फार काळ टिकणारी नाही. त्यामुळे जे कोणी विरोधक आणि अर्थतज्ज्ञ बोलत आहेत. असं काहीच नाही उगाच अफवा आहे.

काही लोक म्हणतात की मंदी आहे आणि त्यामुळे बेरोजगारी ही खूप वाढली आहे. अर्थव्यवस्था ही मंदावली आहे. आणि परिस्थिती ही खूपच कठीण आहे. अशा अनेक विविध प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या पाहा काय आर्थिक मंदीवर जनतेच्या प्रतिक्रिया...

Full View

Similar News