कांद्यांचे भाव का वाढतात?

सामान्यपणे सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यातच का वाढतात कांद्यांचे भाव? काद्यांच्या भाववाढीला नक्की कोण जबाबदार आहे? भाववाढ होते म्हणजे नक्की काय होते? वाचा Sunil Tambe यांचा लेख

Update: 2020-10-27 04:21 GMT

गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर देशात कांद्याचं उत्पादन वाढलं आहे.

मात्र, दरवर्षी सामान्यतः सप्टेंबर ते डिसेंबर या काळात कांद्याची भाववाढ होते.

त्याची कारणं पुढीलप्रमाणे--

१. खरीप कांद्याच्या पिकाला अतिवृष्टीचा फटका बसतो.

२. व्यापारी साठेबाजी करतात

३. आयात-निर्यात धोरणात सातत्य नसतं.

त्यातला महत्वाचा मुद्दा आहे उत्पादनाचा.

५. खरीप हंगामात कांद्याचं उत्पादन घेण्यासाठी अन्य राज्यांतील शेतकर्‍यांना प्रोत्साहन द्यायला हवं.

कांद्याच्या साठवणूकीची व्यवस्था करायला हवी.

६. खरीपाच्या कांद्याची लागवड किती जमिनीवर झाली आहे, त्या पिकाची स्थिती काय आहे? उत्पादन किती होणार आहे याचा शक्य तितका अचूक डाटा निर्णय घेणार्‍यांकडे हवा. मात्र, या दोन्ही बाबींचं निराकरण आपल्या देशातील सनदी अधिकार्‍यांना करता आलेलं नाही.

७. आयात-निर्यात धोरणामध्येही सातत्य नाही. त्यामुळे सप्लाय व्हॅल्यू चेन विस्कळीत होते. याचा फायदा व्यापार्‍यांनी घेतला तर त्याचं आश्चर्य वाटू नये. फसवण्यासाठी, लूटमार करण्यासाठी कोणीही व्यापार करत नसतो.

व्यापारी वा मध्यस्थाचीही सप्लाय व्हॅल्यू चेनमध्ये एक भूमिका असते. त्यांना काढून टाकलं तर ती सप्लाय व्हॅल्यू चेन कोसळून पडेल. त्यांना शह द्यायचा असेल तर नवीन सप्लाय व्हॅल्यू चेन उभारणं हा त्यावरचा उपाय आहे. त्यासाठी भांडवल गुंतवणूक करणं गरजेचं आहे. ही भांडवल गुंतवणूक थेट विदेशी गुंतवणुकीतून येणार नाही. कारण भांडवलावरचा परतावा कमी असेल. अन्यथा व्यापार्‍यांनीही भांडवल गुंतवणूक केली असती.

Tags:    

Similar News