Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात वाढणार थंडीचा कडाका

Update: 2024-01-14 02:03 GMT

मागील काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळाली आहे. पश्चिमेने येणारे थंड वारे आणि आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे या हलक्या सरी सुरु होत्या. दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होऊन थंडीचा कडाका (Cold) वाढेल,असा अंदाज हवामान खात्याने (Department of Meteorology) वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान (Maharashtra Weather Update) कोरडे राहणार आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.




 


राज्यात मागील काही दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. रत्नागिरीमध्ये आणि कोकणात 0.5 मीमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि अहमदनगरमध्ये 7.8 मीमी पावसाची नोंद होती.नाशिक आणि पुण्यात 1.6 मीमी पाऊस झाला. या शिवाय मराठवाड्यात आणि औरंगाबादमध्ये 0.5 मीमी पावसाने हजेरी लावली होती. विदर्भ, अकोल्यात 0.2 तर नागुपरात 0.3 मीमी पावसाची नोंद झाली आहे.




मागील काही दिवसांपासुण पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होऊन कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तापमान किमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Tags:    

Similar News