अस्तित्व टिकविण्यासाठीचा जागतिक संघर्ष - विकास मेश्राम

Update: 2024-02-08 12:46 GMT

भारतातच नाही तर इतर अनेक देशांतही शेतकरी आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. या देशांमध्ये जर्मनी, हॉलंड, फ्रान्सचा समावेश आहे. जर्मन शेतकरी त्यांच्या उत्पादनास शेतीमालास योग्य दर न मिळाल्याबद्दल आणि नवीन पर्यावरण संरक्षण पद्धतींविषयी असंतुष्ट आहेत. काही महिन्यांपूर्वी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये हजारो ट्रॅक्टरसह ४० हजारांहून अधिक शेतकरी आंदोलनासाठी एकत्र जमले होते. हॉलंडमधील शेतकऱ्यांची सर्वांत मोठी तक्रार म्हणजे नवीन पर्यावरण नियम. कारण बहुतेक शेतीची जमीन कॉर्पोरेट कंपन्यांनी ताब्यात घेतली जाणार आहे. तरीही सरकारला पिकाला मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावे लागणार आहे.

प्रत्येक शेतकरी आंदोलन हे भूक आणि शेतीच्या बाजाराची लढाई असते. हे सांगणे चुकीचे ठरणार नाही की जमीनदार, जहागीरदार किंवा राज्यकर्त्याने नेहमीच कुठल्या तरी स्वरूपात बाजारावर अधिकार व नियंत्रण ठेवले आहेत. हेच कारण आहे की मागणीपेक्षा धान्य उत्पादन जास्त असूनही भारतातील १९ कोटी लोकांना भुकेने उपाशी राहावे लागत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्नसुरक्षा २०२०च्या अहवालानुसार ही वस्तुस्थिती आहे. आफ्रिकेच्या बऱ्याकच संसाधनविरहित देशांमध्ये उपासमारीची परिस्थिती कायम आहे. देशात सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन याच संघर्षाचा एक भाग आहे. बाजारपेठ मालक आणि शेतकरी यांच्यात हा अक्षरशः संघर्ष आहे. बाजारावर जगभरातील देशांची अवलंबित्व जसजशी वाढली आहे, त्याच प्रमाणात, शेतकऱ्यांाचे हक्क हिसकावण्याचे हत्यार अधिक तीव्र झाले आहे. ज्यांनी बाजारावर अधिराज्य गाजविले त्यांना लागवड केलेल्या जमिनीचा ताबा घेण्याचा एक मार्ग म्हणून सापडला. अमेरिका आणि युरोपच्या बऱ्याच देशांमध्ये हे केले गेले आहे.

डॉ. विल्यम हेफर्मन यांनी शेतकऱ्यांयऐवजी बाजाराच्या नियामकांकडून शेतजमिनींच्या ताब्यात घेण्याच्या कल्पनेवर सातत्याने विचार करण्याचे काम केले. मिसुरी विद्यापीठातील ग्रामीण समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेफर्मन यांनी एका अभ्यासाच्या आधारे शेतीच्या औद्योगिकीकरणाबद्दल बोलताना सांगितले, की येत्या काही वर्षांत मोजक्या कंपन्या संपूर्ण अन्नसाखळीवर वर्चस्व गाजवतील. डॉ. हेफर्मन यांनी आपल्या निष्कर्षांमध्ये असे सांगितले, की अन्नसाखळीच्या क्षेत्रातील संरचनात्मक बदल इतके व्यापक आणि मजबूत असतील की त्यांचा कृषी धोरणांच्या योजनेच्या कक्षेत येण्याचा विचार करता येणार नाही. त्यांनी या बदलांना ‘शेतीचे औद्योगिकीकरण’ म्हटले. परिणामी, ‘अन्न उत्पादन’सारख्या वाक्यांचा उपयोग आता आर्थिक दृष्टीने केला जात आहे. नवीन अन्न प्रणालीच्या बाहेर कृषी धोरण तयार करणे शक्य होणार नाही, असेही ते म्हणाले. या संदर्भात, हे माहीत असणे देखील महत्त्वाचे आहे की एकूण बहुराष्ट्रीय कंपन्यांनी संपूर्ण अन्नसाखळी आपल्याकडे साठविली आहे. काही मूठभर कंपन्यांनी संपूर्ण शेतीचा ताबा घेतल्यामुळे बियाणे, खत, सिंचन, उत्पन्न या विषयी योग्य माहिती मिळविणेही कठीण झाले आहे. कारण या कंपन्या जागतिक स्तरावर व्यवसाय करीत आहेत, परिणामी त्यांनी कोणत्या देशात कोणत्या धोरणात अंमलबजावणी केली हे आपण समजू शकत नाही. यासह, त्यांनी आपल्या विशाल व्यवसायात डझनभर लहान कंपन्यांना भागीदार म्हणून बनविले आहे.

डॉ. हेफर्मन यासारख्या अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आणि शेतीच्या भविष्याबद्दलच्या त्यांच्या कल्पनांचे अनुसरण करणारे व्यापारी यांनी यापूर्वीच अगदी नेमके एक ब्लू प्रिंट तयार केले होते. ते म्हणाले होते, की पुढील दशकात एकूण शेतजमिनींचे मालक २५ हजार राहिले तर मोठ्या संख्येने लोक या कामातून मुक्त होतील. नंतर अमेरिकेच्या सरकारने या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आणि त्यांची जमीन देण्यास तयार असलेल्या शेतकऱ्याला पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली. ‘आम्ही प्रत्येक शेती वाचवू शकत नाही, परंतु प्रत्येक शेतकरी कुटुंब वाचवू’ अशी घोषणा तेथील सरकारने दिली.

भारतासारख्या विकसनशील देशांचे कर्तव्य जागतिक व्यापार संघटनेच्या करारामुळे धोक्यात आले आहे. जर तुम्हाला शेती करायची असेल तर आता शेतकऱ्यााला शेतीमालक म्हणून नव्हे, तर मजूर म्हणून शेती करावी लागेल. त्यांना त्यांच्या वेतनासाठी मजुरी मिळेल. अमेरिका त्याचे पहिले उदाहरण बनले. तेथे १९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत शेतकऱ्यांहनी पिकाच्या योग्य किमतीसाठी संघर्ष केला. अमेरिकेतही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणेच अनेक हजार शेतकरी ट्रॅक्टरसह राजधानी वॉशिंग्टनमध्ये गेले. याचा परिणाम म्हणून सरकारने असे नियम बनवले, की शेतकऱ्यां च्या मागण्या पूर्ण करण्याच्या नावाखाली शेतीची जमीन हळूहळू कॉर्पोरेट बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या ताब्यात घेतली. हेच काम आपल्या देशात कृषी सुधारणेचे उद्दिष्ट असलेल्या तीन नवीन कायद्यांद्वारे केले जाईल.

डॉ. विल्यम हेफर्मन केवळ त्यांच्या भाषेत शेतीबद्दलच बोलत नाहीत तर मांसाहारी लोकांसाठी वापरल्या जाणाऱ्याा प्राण्यांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्याविषयी देखील बोलले. कृषी आणि ग्रामीण समाजाच्या दृष्टिकोनातून विविध पक्षी, दूध उत्पादक जनावरे आणि अन्नासाठी वापरल्या जाणाऱ्याय प्राण्यांच्या प्रश्नां चा त्यांनी अभ्यास केला आणि सांगितले की मानवजातीला अन्न ही आवश्यक आणि सतत गरज आहे. परिणामी, भविष्यात, आर्थिक शक्ती त्या व्यक्तीच्या ताब्यात जाईल, जो कृषी आणि अन्नसाखळी नियंत्रित करेल. या नियंत्रणासाठी आम्ही आगामी काळात भयंकर स्पर्धा होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. हे जाणून घेणे उपयुक्त ठरेल की एडीएम कंपनी ही जगातली सर्वांत मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी अन्नप्रक्रिया आणि त्यांच्या व्यापारात गुंतलेली आहे, ज्याचे २०१९ मध्ये ६४.६६ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न होते. या अमेरिकन विकासाचा सर्वांत महत्त्वाचा संदेश म्हणजे भारतातील शेतकऱ्यांवना, तेथील बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे शेतीच्या व्यवसाय हस्तांतरित करण्याचा निर्णय बहुमताने झाला नाही किंवा लोकांच्या मतानेही झाला नाही. हा निर्णय त्यांच्यावर लादला गेला आणि यांचे समर्थन करणाऱ्यांरची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. तथापि, सद्यःस्थितीत अन्नप्रणालीबाबत पुन्हा नवीन प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि भावी पिढ्यांचा हवाला देऊन त्यांची उत्तरे शोधली जात आहेत. अर्थात, भारतीय शेतकरी आंदोलन, जर्मनी आंदोलन हे इतर देशातील संघर्ष करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल.

Tags:    

Similar News