सिताफळ लागवडीतून वर्षाला 50 लाख रुपये उत्पादन...!

आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या बीड जिल्ह्यातच आपल्या पारंपरिक शेतीला फाटा देत गेवराईच्या रामनाथ दाभाडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सीताफळ लागवड करून आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे, प्रतिनिधी हरीदास तावरेंचा रिपोर्ट

Update: 2022-11-28 11:46 GMT

 बीड जिल्हा म्हटलं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो याच बीड जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये तब्बल 220 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत मात्र एकीकडे आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या बीड जिल्ह्यातच आपल्या पारंपरिक शेतीला फाटा देत गेवराईच्या रामनाथ दाभाडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सीताफळ लागवड करून आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. तर रामनाथ दाभाडे हे हो वर्षाकाठी पन्नास लाख रुपये उत्पादन आपल्या शेतीतून मिळवत आहेत तर बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते आव्हान करत आहेत की आपणही आपल्या शेतामध्ये पारंपारिक शेतीला फाटा देत फळबाग लागवड करा व आपल्या उत्पादनात वाढ करावी असे आव्हानही त्यांनी केले आहे.




 


मी पूर्वी कापूस पिकाची शेती करायचो. 1992 पासून कापूस लागवड करत होतो, 2017 पर्यंत कापूस लागवड करत होतो, त्या कापसाच्या शेतीमध्ये वर्षाला अडीचशे ते तीनशे क्विंटल पर्यंत कापूस होत होता, त्याच्यामध्ये त्याच्यात खर्चच अर्धा निघून जात होता, जवळपास 70 टक्के खर्च होत होता, मजुराची अडचण गड्याची अडचण, कधी अतिवृष्टी कधी कधी कमी पाऊस, त्याला कीड प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला, त्यामुळे आम्ही कापसाचा निर्णय कमी केला, त्यानंतर आम्ही सिताफळ लागवड करायचा निर्णय घेतला, त्यावेळेस मला साधारण वर्षाला नव्हते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न येत होतं, आज रोजी मला 50 लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळत आहे, आज माझं जवळपास दहापट उत्पन्न वाढलं आहे, अपेक्षा अपेक्षा चार पटीने पैसे मिळाले आहेत, मी लावता वेळेस असा विचार केला होता की आपल्याला वर्षाला पंधरा लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळेल पण माझ्या अपेक्षा पेक्षाही जास्त उत्पन्न मला मिळाला आहे, यावर्षी मला 50 लाख रुपयांचा उत्पन्न झालं आहे, आणि पुढच्या वर्षी या बागेला दीडपट माल लागणार आहे, याचं उत्पादन अजूनही वाढणार आहे.

हे झाड साधारण 40 वर्षे टिकत, या झाडाला मरण नाही आपण पाहतो की जी गावरान जुनी झाड आहे ते आपण लहानपणापासून पाहतो ती तशीच आहेत, ही फळबाग चांगली आहे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीतील अर्ध्या तरी जमिनीत फळबाग लागवड करावी, सिताफळ लावा,अंगूर लावा किंवा कोणतीही फळबाग लावा, पाणी जितका आहे तितकी फळबाग आपल्याकडे असायलाच पाहिजे, असे शेतकरी रामनाथ दाभाडे म्हणाले.




 



शेतामध्ये एक सीताफळाचे झाड उघडलं होतं झाडाला आम्ही मोठे झाल्यावर त्याला खत पाणी घातलं व त्याला पहिल्या वर्षी चांगली फळ लागली त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीही त्याला अधिक फळ लागत गेली नंतर आम्ही विचार केला की जर आपण सीताफळाची लागवड केली तर, आम्ही पाहुण्याकडे लग्नानिमित्त गेलो असता त्यांच्याकडे सीताफळाची बाग होती मग आम्ही घरी विचार केला की आपण सुद्धा सीताफळाची बाग लावु, आम्ही त्यांच्या बागेमध्ये जाऊन पाणी केली व आम्ही त्यांना सविस्तर माहिती विचारली असता व रोपांची ही माहिती विचारली व ही रोपे त्यांच्याकडेच मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही रोपे घेतली व लागवड केली आहे.

यावर्षी पाऊस काळ कमी होता व विहिरीत जसं जसं पाणी तसं तसं रात्री दिवसा या झाडाला पाणी घातलं लहानाची मोठी केली, पहिल्या वर्षी बऱ्यापैकी फळ लागलं व उत्पन्नही निघालं व आता यावर्षी सुद्धा उत्पन्न चांगलं निघाला आहे, त्या पिकापेक्षा हे पीक घेतल्यामुळे आम्हाला चांगलं वाटू लागला आहे, खर्तडीच्या काळात आम्ही हे झाड लावलं त्यामुळे आम्हाला आनंद वाटत आहे, मोठ्या मुलांना व माझ्या मिस्टरांनी या झाडांची जास्त काळजी घेतली, फळबाग करावीच ही आमची तिघांची इच्छा होती, कुणीतरी महिलांनी अशी हिम्मत करायला पाहिजे, आपण केल्याचं फळ मिळत आहे असं वाटायला लागला आहे, कापूस किंवा इतर पिके घेतल्यास त्याला मजूर मिळत नाही मात्र याला मजूर कमी लागत आहे, पण काहीतरी केलं तर चीज पाहिला मिळत आहे, असे जयश्री दाभाडे महिला शेतकरी यांनी सांगितले.




 


बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यात होतात व सर्वात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो, अशा शेतकरी पुत्र बांधवांना मी विनंती करेल की, गावच्या कट्ट्यावर न बसता वडील जे शेती करतात त्यांना मदत केली पाहिजे, आणि विशेष म्हणजे जे तरुण सुशिक्षित आहेत त्यांना मी एक आव्हान करतो की माझी बीएससी झाली आहे, मला कॉल असताना सुद्धा मी नोकरी न करता मी शेती हा व्यवसाय निवडला, शेतीला जोड व्यवसाय सुरू करा, डॉक्टर असेल तर त्याला त्याचे औषधाचे सगळे फायदे व तोटे माहीत असतात इंजिनिअर असेल तर त्याचे त्याला सगळे इस्टिमेट माहित असतात हवा आणि ऊन आपल्या झाडांना कोणत्या दिशेने व्यवस्थित मिळेल,

सर्व सुशिक्षित लोकांना घेऊन एक गट तयार करून, काही कृषी विभागाची लोकं व काही कृषी पदवीधरांना एकत्र करून, सर्वांनी शेती हा प्रोफिटेबल व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर शेती व्यवसायात वाढ होईल, आपले वडील, आजोबा हे जी पारंपरिक शेती करतात त्याला फाटा ते आपण वेगळी शेती केली पाहिजे असे मी सर्व तरुणांना आवाहन करत आहे. असे रवी दाभाडे यांनी शेवटी सांगितले.

Tags:    

Similar News