चेंबूरच्या आजीबाईंचा फराळ सातासमुद्रापार

Update: 2017-10-16 08:26 GMT

चेंबूरमध्ये २३ वर्षांपूर्वी काही वृद्ध महिलांनी एकत्र येऊन महाराष्ट्र महिला गृहउद्योग संस्था सुरु केली. त्यांच्या या गृहउद्योगाची चर्चा आता परदेशातही जाऊन पोहचलीय. वर्षभर विविध सणांसाठी खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या वृद्ध महिलांनी दिवाळीत केलेल्या दिवाळी फराळाला मोठी मागणी वाढली आहे.

टिळकनगर परिसरात राहणाऱ्या शोभना गोगटे (वय ८४) आणि शीला बर्वे (वय ८३) यांनी २३ वर्षांपूर्वी महाराष्ट्र महिला गृह उद्योग या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून या महिला विविध सणांच्या वेळी विविध पदार्थ तयार करून ते ऑर्डरप्रमाणे विकत आहेत. त्यांच्यासोबत सध्या १० ते १२ अन्य वृद्ध महिलाही काम करीत आहेत. होळी, गुढीपाडवा या दिवशी तर पुरणपोळीसाठी या ठिकाणी ग्राहकांची झुंबड उडते. दिवाळीत करंज्या चकली, लाडू, अनारसा, चिवडा, शेव, शंकरपाळे आणि बेसन लाडूच्या पिठाला मोठी मागणी असते.

https://youtu.be/H8vNcDV8kVw

Similar News