ढापरपाडा....जव्हारमधील पर्यटनाची एक नवी सुरवात..

Update: 2018-08-22 14:13 GMT

ढापरपाडा एक अनोखी पर्यटन पर्वणी

मुंबई,नाशिक, गुजरात पासून जवळच असलेले आदिवासीबहुल जव्हार तालुका हा धबधब्याचा तालुका समजला जातो, त्यातील खड-खड ग्रामपंचायत मधील 10-12 घरांचा

पाडा-ढापर पाडा.... डोंगराच्या कुशीत वसलेला आणि खडखड धरणाच्या अथांग किनारा लाभलेला पण बेरोजगारी ने ग्रासलेला रोजगारासाठी तालुक्याच्या किंवा मिळेल तिथे कामासाठी जाणारा..

ह्याच बेरोजगारीला आळा घालण्यासाठी व स्वतःहाचा रोजगार स्वतः मिळवण्यासाठी मिळालेल्या नैसर्गिक संपत्तीचे सोने करण्यासाठी गरज होती ती परिवर्तनाची...

त्याच परिवर्तनासाठी पाड्यातील सर्वानी एकत्र येऊन सुरवात केली ती "परिवर्तन बचत गटाची"

त्यांना साथ मिळाली ती कै. बी.एन.घोलप फाउंडेशनची.

जव्हार पासून 10 किलोमीटरवर असलेले खडखड धरणाच्या किनारी वसलेला ढापरपाडा...

याच ढापरपाड्यात "कै. बी.एन. घोलप फाउंडेशन" व "परिवर्तन बचत गटाने' एकत्र येऊन "ग्रामीण पर्यटनाची" सुरवात केली आहे. या ग्रामीण पर्यटनात आपल्याला अनुभवता येणार आहे ते

१.बीन दुधी चहा (ब्लॅक टी)

२.गरमागरम लिंबू मसाला लावलेले कणीस

३.जंगली भाज्यांचे पौष्टिक जेवण

३.गावठी चिकन व नागलीची भाकरी

४.पाड्यातील घरांमध्ये त्यांच्या सोबत राहण्याचा अनुभव अगदी वाजवी दरात

५.अथांग किनारा

६.हॉर्न फ्री व प्लास्टिक मुक्त गाव

७.तारपा नृत्य

८.ढोलनाच

९.वारली पेंटींगची कार्यशाळा अजून बरेच काही.

 

https://youtu.be/91YyZ4DC1cs

Similar News