कारविजेती कादंबरी लिहिणार्या अर्नेस्ट हेमिंग्वेने आत्महत्त्या केली होती. या कादंबरीत जगण्याचा अतुलनीय संघर्ष चित्रित करणारा हा प्रतिभावंत कादंबरीचा शेवट आशावादी करतो, मात्र व्यक्तीगत जीवनात त्याला जगणे संपवण्याचा निर्णय घ्यावा लागतो. हे त्याच्यासाठी किती यातनादायी, गुदमरवणारे असेल.जगाला प्रेम अर्पावे असे सांगणारे मातृहृदयाचे साने गुरुजी आत्महत्त्या करतात ती फक्त हारजीत या मोजपट्टीत बसवता येईल? अस्पृश्यांच्या पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी आयुष्य पणाला लावणारे लढवय्ये गुरुजी भेकड असतील?