Mumbai's Marathi identity : फक्त मुंबईत मराठी माणसांबद्दलचा इतका आकस आणि द्वेष का?
महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुका घेऊन लोकशाहीला काळिमा फसणारं घाणेरडं राजकारण सुरु आहे. ठाकरे कुटुंबाने मुंबई आणि मराठी माणसांसाठी काय केलं? महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं मुंबई आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर अस्सल मुंबईकर यांचा लेख
Mumbaikar मुंबईकर मित्रांनो,
मुंबईत Thackeray "ठाकरे शब्दाला" महत्त्व आहे? हा प्रश्न फक्त काही सडक्या मेंदुतूनच निघू शकतो. मी कुठल्या ही राजकीय पक्षाचा नाही. पण Mumabi मुंबईत Marathi मराठी भाषेचा मान राखला गेलाच पाहिजे हे इतके वर्ष कोणी ठणकावून सांगितलं? मुंबईच्या प्रत्येक दुकानावर मराठी पाट्या असल्याच पाहिजे म्हणून कोणी आंदोलनं केली? मराठी तरुणांना ८०% नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे म्हणून गेली कित्येक दशके कोणी संघर्ष केला? फक्त आणि फक्त एका माणसाने आणि ते म्हणजे माननीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे! आणि आता उद्धव ठाकरे व राज ठाकरे... Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray and Raj Thackeray तरी आपण जर विचारत असू की ठाकरे कुटुंबाने मुंबई आणि मराठी माणसांसाठी काय केलं? तर हा आपला निव्वळ नतद्रष्टपणाच नाही तर नालायकपणा आहे! आज मुंबईत मराठी माणसांच्या अस्तित्वचा प्रश्न निर्माण झालेला आहे! तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही काय करायला पाहिजे हे सांगण्याची गरज नाही. आपल्या एकजुटीची ताकत दाखवण्याची वेळ आलेली आहे.
बिनविरोध निवडणुका म्हणजे काय ?
मुंबई आणि महाराष्ट्रात सध्या लोकशाहीला काळिमा फसणारं घाणेरडं राजकारण सुरु आहे. कारण कुणालातरी उद्या संपूर्ण मुंबईच एखाद्या खासगी बिल्डरला आंदण म्हणून द्यायची आहे. मुंबईचं मराठीपण कायमच नष्टच करून टाकायच आहे. होय मला आता खात्री आहे की काही धनदांडग्यांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायचीच नाही.
देशात भाषावार प्रांत रचना (linguistic states) होण्याचे मुख्य कारण म्हणजे भाषेच्या आधारावर प्रशासनाची सोय, लोकांची भाषिक ओळख जपणे आणि शिक्षणाचे कार्य मातृभाषेतून प्रभावीपणे करणे हे होते. ब्रिटिशांनी केलेल्या प्रांतांची रचना भाषेनुसार नव्हती, त्यामुळे स्वातंत्र्यानंतर, जनतेची मागणी आणि प्रशासकीय सोयीसाठी, भाषावार प्रांत रचनेचा ठराव काँग्रेसने स्वीकारला. यामुळे लोकांना त्यांच्या मातृभाषेनुसार राज्ये मिळाल्याने प्रशासनाचे काम सोपे झाले आणि लोकांची भाषिक अस्मिता जपली गेली, जसे की गुजरात, पंजाब, बंगाल, राजस्थान इत्यादी राज्यांची निर्मिती झाली.
पण मुंबई महाराष्ट्राला मिळाली नव्हती. तेव्हा सुद्धा घाणेरडं राजकारण खेळलं गेलं. आणि म्हणून मुंबई-सह संयुक्त महाराष्ट्राचा मोठा लढा दिला गेला; त्यात १०५ मराठी लोकांचे रक्त सांडल्यावर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. हा इतिहास पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आज का भासते कारण 'मुंबई ही कॉस्मोपोलिटन' आहे आणि म्हणून इतरांचा देखील इथं हक्क आहे ही सबब सांगून मराठी माणसांना मागे रेटायच. मुंबईत संपूर्ण देशातून व्यापारी आले आणि मुंबईत सगळीकडे पैशाचा धूर निघाला! मुंबई विकत घेवून आपली सत्ता निर्माण करायची हा त्या मागचा एकमेव कुटिल हेतु.
या व्यापाऱ्यांनी Mumbai is cosmopolitan"मुंबई कॉस्मोपोलिटन" या गोंडस नावाखाली मुंबईच मराठी पण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मराठी शाळा, भाषा, सण-संस्कृती, नाट्य-चित्रपट इतकंच काय नव्हे तर एकूणच मराठी माणूसच मुंबईतून हद्द पार करण्याचा प्रयत्न केला. आज मुंबईच्या जमिनी खासगी बिल्डर्सला कवडी मोल भावाने देऊन तिथे जे मोठ मोठे इमले उभारले जातील त्यात कष्ट करणारे मराठी माणसं नसतील!
आपल्याला सगळे धर्मीय हवेत - होय अगदी गुजराती, मारवाडी, जैन, मुस्लिम, सिख, क्रिसचन सगळे सगळे हवेत आणि आज पर्यंत सगळे गुण्या-गोविंदाने आनंदाने मुंबई वास्तवात करीत होतेच की? त्यांच्या अस्तित्वाला कुठेही धक्का न देता जर मराठी तरुणांना नोकऱ्या आणि घरे प्राधान्याने आणि सवलतीने दिली तर कुठे आणि कुणाच काय बिघडणार आहे? आज जगभर स्थानिक लोकांचे प्रश्न तेथील सरकार सोडवायला पुढाकार घेत आहे यात सिंगापुर ते अमेरिका, लंडनसारखी मोठे देश देखील आहेत. मग फक्त मुंबईत मराठी माणसांबद्दलचा इतका आकस आणि द्वेष का?
म्हणून आताची मुंबई महानगरपालिका निवडणूक ही खूपच महत्वाची आहे. पुन्हा सांगतो आज मुंबईत मराठी माणसांच्या अस्तित्वचा प्रश्न निर्माण झालेला आहे! तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही काय करायला पाहिजे हे सांगण्याची गरज नाही. आपल्या एकजुटीची ताकत दाखवण्याची वेळ आलेली आहे.
आपला नम्र पण अस्सल मुंबईकर