Elon Musk’s Future Prediction : पैसा आणि कामाच्या जबाबदारीशिवाय माणसाला जगता येणार !
एलॉन मस्क जेव्हा भविष्याबद्दल बोलतो, तेव्हा जग थांबून ऐकतो... महागाई, बेरोजगारीने सर्वसमान्यांचे कंबरडं मोडलेलं असताना जगातील सर्वात श्रीमंत प्रभावशाली उद्योजक एलॉन मस्क काय भविष्यवाणी करतो? सोशल मीडियावर होणारी चर्चा... खरचं काम, पैशाशिवाय माणसाला जगता येणार का ? वाचा
हेडलाईन वाचून नक्कीच आपण असा विचार करत असाल ही कसली Prediction भविष्यवाणी… Unemployment बेरोजगारी, inflation महागाईने सर्वसामान्यांचे जीवन वेटीस धरलेले असताना अशी भविष्यवाणी केवळ हास्यास्पद किंवा कुणीतरी prank विनोद करतंय की काय असं वाटेल. Social media सोशल मीडियावर या भाकिताची उलट-सुलट चर्चाही सुरु झाली आहे. परंतु Elon एलॉनची भाकितं आणि त्यावर त्याची Work काम करण्याची पद्धत पाहता तो काहीही करू शकतो हे आपण मधील काळात पाहिलचं असाल. तो फक्त पैशांनीच नाही तर बुद्धीनेही श्रीमंत असून त्याने आपल्या दूरदृष्टीतून लोकांच्या जीवनपद्धती बदलण्याचा आणि त्यांच्या विचारापलीकडचा विचार करण्याचं धाडस केलं आणि करत आहे.
एलॉन मस्क, Tesla टेस्ला आणि SpaceX स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचा संस्थापक आणि जगातील सर्वात प्रभावशाली उद्योजकांपैकी Entrepreneurs एक, नेहमीच भविष्याबाबतच्या धाडसी भविष्यवाण्या करून त्या सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत ही घेतो.
काही दिवसांपूर्वी (दिनांक- २१ नोव्हेंबर २०२५) Washington D.C. वॉशिंग्टन डी.सी. येथे U.S. - Saudi Investment Forum यू.एस.-सौदी इन्व्हेस्टमेंट फोरममध्ये, मस्कने एका पॅनेल चर्चेत सांगितले की, भविष्यात मानवी work काम करणे “ऐच्छिक” (ऑप्शनल) होईल आणि Money पैसा “अर्थहीन” (इररेलेव्हंट) होईल 'work will be optional and money irrelevant’. म्हणजे ज्याला काम करणं आवडेल त्यांनाच करावे लागेल, आणि पैशांचं महत्त्व कमी होईल किंवा पूर्णपणे अर्थहीन होईल.
मस्कच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता AI (एआय) आणि रोबोटिक्सच्या प्रचंड प्रगतीमुळे हे शक्य होणार आहे. रोबोट्स Farming शेती करतील, कारखाने चालवतील, गाड्या बनवतील, डॉक्टरकी करतील आणि घर सांभाळतील. ऊर्जा सूर्यप्रकाशातून इतकी मुबलक आणि स्वस्त होईल की Electricity वीज बिलाची चिंताच राहणार नाही. अन्न, कपडे, घर, वाहने, शिक्षण, वैद्यकीय सेवा – सगळेच इतके स्वस्त किंवा जवळजवळ मोफत होईल की पैशाची गरजच संपेल. “हो, काही मर्यादा कायम राहतील – वीज, गुरुत्वाकर्षण, भौतिकशास्त्राचे नियम,” मस्क हसत हसत म्हणाले, “पण रोजच्या आयुष्यात पैसा विचारातच येणार नाही.”
एलॉन मस्कची ही भविष्यवाणी सत्यात कशी उतरेल याची उदाहरणे बघुयात
अन्न आणि शेती Food and Agriculture : कल्पना करा, तुमच्या घरात एक रोबोट आहे जो २४ तास शेतात काम करतो. तो एआय वापरून पाणी, खत आणि कीटकनाशके व्यवस्थित करतो. परिणाम? भाज्या, फळे इतकी मुबलक आणि स्वस्त होतील की, त्या मोफत मिळतील. उदाहरण: आज वर्टिकल फार्मिंग (उंच इमारतीत शेती) सुरू आहे. भविष्यात, तुम्ही “सुपरमार्केट” ऐवजी “रोबोट फार्म” मधून घेऊ शकता. मस्क यांचे उदाहरण: “जसे आज तुम्ही भाजी विकत घेता किंवा स्वतः उगवता. उगवणे कष्टाचे, पण छंदासाठी!”
वाहतूक आणि कार्स Transportation and Cars : टेस्लासारख्या स्वयंचलित चारचाकी गाड्या आजच रस्त्यावर आहेत. भविष्यात, रोबोट्स कार बनवतील, चालवतील आणि दुरुस्त करतील. तुम्हाला कार खरेदी करण्यासाठी पैसा नको. ती इतकी स्वस्त असेल की, शेअरिंग किंवा मोफत मिळेल. उदाहरण: उबरसारख्या अॅप्स आजच ड्रायव्हरलेस गाड्यांची चाचणी करत आहेत. कल्पना करा, तुम्ही “एआय, मला मुंबईला ने” म्हणाल, आणि कार येईल ते पण पैशाशिवाय.
आरोग्य आणि डॉक्टर Health and doctors : एआय डॉक्टर तुमच्या आजाराचे निदान करेल, औषधे सुचवेल आणि अगदी ऑपरेशन करेल. उदाहरण: आज आयबीएम वॉटसन कॅन्सरचे निदान करतो. भविष्यात, हॉस्पिटलमध्ये रोबोट सर्जन असतील, आणि वैद्यकीय सेवा मोफत होईल. आणखी उदाहरण: पॅंडेमिकमध्ये टेलिमेडिसिनने दाखवले की, डॉक्टरांना भेटण्याची गरज कमी होऊ शकते. मस्क म्हणतात, “एआयमुळे आरोग्य इतके सोपे होईल की, पैसा विचारातच येणार नाही.”
शिक्षण आणि नोकऱ्या Education and jobs : एआय टीचर तुम्हाला वैयक्तिकरित्या शिकवेल, जसे आज खान अकॅडमी किंवा कोर्सेरा. उदाहरण: कल्पना करा, एक रोबोट तुमच्या मुलाला गणित शिकवतो, आणि ते मोफत! आणखी उदाहरण: कारखान्यांत रोबोट्स उत्पादन करतील, जसे अमेझॉनच्या वेअरहाउसेस. परिणाम? नोकऱ्या बदलतील लोक फक्त सर्जनशील काम करतील, जसे चित्र काढणे किंवा गाणे लिहिणे.
ऊर्जा आणि पर्यावरण Energy and Environment : मस्कच्या टेस्ला आणि सोलरसिटीमुळे सूर्यप्रकाशापासून मुबलक वीज मिळेल. उदाहरण: सौदी अरेबियासारखे देश मोठे सोलर फार्म्स बांधत आहेत. भविष्यात, वीज इतकी स्वस्त असेल की, तुम्ही घरात लाईट्स कधीच बंद करणार नाही, आणि पैसा वाचवण्याची चिंताच नाही.
वरील उदाहरणे दाखवतात की, मस्क याची कल्पना वास्तविक ट्रेंड्सवर आधारित आहे. हे “स्टार ट्रेक” सारखे जग आहे, जिथे मशिन्स सर्व काही पुरवतील.
हा सिद्धांत काय आहे?
या सगळ्याला “अबंडन्स इकॉनॉमी” किंवा “विपुलतेचे भविष्य” म्हणतात. सोप्या शब्दात: जेव्हा तंत्रज्ञान (एआय, रोबोट्स) सर्व काही इतके मुबलक करेल की, अभाव (स्कार्सिटी) संपेल. जेव्हा सर्व काही भरपूर असेल तेव्हा पैसा काय कामाचा?
• कसे सुरू होईल? आजपासून! मस्क यांच्या xAI आणि टेस्लासारख्या कंपन्या एआय विकसित करत आहेत.
• फायदे: मानव मुक्त होईल. छंद, कला, शोध यासाठी जगेल. मस्क म्हणतात, “युनिव्हर्सल हाय इनकम” म्हणजे तंत्रज्ञानामुळे सर्वांना श्रीमंत वाटेल.
• संक्रमण आणि आव्हाने : हा सिद्धांत १०-२० वर्षांत साकार होईल, पण त्यासाठी मोठी कामे करावी लागतील. जसे एआय विकसित करणे. टीकाकार म्हणतात की, हे श्रीमंतांसाठी सोपे आहे, पण गरीबांसाठी नोकऱ्या गेल्याने असमानता वाढेल.
हा सिद्धांत रे कुर्झवेल सारख्या विचारवंतांकडून आला आहे, ज्यात “टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटी” (एआय मानवापेक्षा हुशार होणे) महत्वाची भूमिका बजावते.
गेल्या काही वर्षांत मस्कनी ही कल्पना अनेकदा मांडली आहे. तो याला “विपुलतेचे भविष्य” (Abundance Future) म्हणतात. त्याच्या टेस्ला कंपनीचे ऑप्टिमस रोबोट, xAI चे ग्रोक मॉडेल आणि जगभरातील सोलर फार्म्स हे सगळेच त्या दिशेने चाललेले पाऊल आहे. स्टार ट्रेक सिरीजमधील ते जग, जिथे मशीन सर्व काही पुरवते आणि माणूस फक्त शोध आणि सर्जनशीलतेसाठी जगतो, मस्क याला प्रत्यक्षात उतरवायचे आहे.
मात्र हा बदल एका रात्रीत होणार नाही. त्याआधी लाखो नोकऱ्या जातील, समाजात अस्वस्थता निर्माण होईल. म्हणूनच मस्क “युनिव्हर्सल हाय इनकम”ची बतावणी करतो. म्हणजे सरकार किंवा तंत्रज्ञानातून प्रत्येकाला मुबलक उत्पन्न मिळेल, पण ते नोकरीतून नव्हे.
जगभरातून या विधानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोणी ते स्वप्नवत मानत आहे, तर कोणी श्रीमंताची बेफिकीर कल्पना म्हणून हसत आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे. एलॉन मस्क जेव्हा भविष्याबद्दल बोलतो, तेव्हा जग थांबून ऐकतो. कारण त्याने यापूर्वी जे जे सांगितलं इलेक्ट्रिक कार्स, अवकाश प्रवास, मेंदूत चिप ते प्रत्यक्षात उतरलेले आपण पाहिले आहे.
आता फक्त वेळ सांगेल की, पुढच्या पिढीला खरोखरच पैशाशिवाय आणि कामाच्या जबाबदारीशिवाय जगता येईल का?