आचार्य !

Update: 2020-06-13 05:16 GMT

लेखक, कवी, विडंबनकार, चित्रपट कथा लेखक, नाटककार, दिग्दर्शक, फर्डा वक्ता, शिक्षक, राजकीय नेता, संपादक अशा दशगुणांनी व त्याहून अधिक विशेषणांनी मंडित अशी एक व्यक्ती या भूतलावर अवतरली असेल तर ते होते आचार्य प्रह्लाद केशव अत्रे! त्यांची आज जयंती! त्यांच्या स्मृतींना दंडवत!

महाराष्ट्र संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांत अत्रेंनी केवळ मुक्त वावर केला नाही तर अधिराज्य गाजवले. ते जिथे जिथे वावरले, त्या त्या राज्यांचे अनभिषिक्त सम्राट बनले. त्यांनी उत्तमोत्तम नाटके व चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केलेच, शिवाय 'मराठा', 'नवयुग' या सारख्या दैनिक, साप्ताहिकांचे संपादनही केले.

पण आचार्य अत्रेंचे नाव मराठी मनामनात कायमचे रुजले ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांच्या नेतृत्वामुळे. अत्रेंना संयुक्त महाराष्ट्र आंदेलनाच्या पंचप्राणापैकी एक मानले गेले. आपल्या फर्ड्या वक्तृत्वाने त्यांनी लारा महाराष्ट्र एकवटला. अखेर पंडित नेहरूंना 'महाराष्ट्र' राज्याच्या स्थापनेची मागणी मान्य करावीच लागली.

हे ही वाचा..

मोदी सरकारचं यश आणि अपयश

जळक्या हिंदुराष्ट्राचा भयंकर खेळ

चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे

याच काळात अत्रे प्रत्यक्ष राजकारणात उतरले व संयुक्त महाराष्ट्र समितीच्या तिकिटावर आमदारही झाले. नंतर त्यांनी लोकसभाही लढवली पण ते पराभूत झाले.

असे अत्रे. 'मराठा'तून विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवणाऱ्या अत्रेंनी 'श्यामची आई' या भावनाप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन करून पहिले 'सुवर्ण कमळ' मिळवलेत, शिवाय नंतर 'प्रीतीसंगम' या नाटकाचे लेखनही केले.

असा हा बहुआयामी नेता १३ ॲागस्ट १९६९ला जगाचा निरोप घेऊन निघून गेला. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर 'गेल्या दहा हजार वर्षांत महाराष्ट्रात असे व्यक्तिमत्व झाले नाही'!

Similar News