बारामती शहर व परिसरात साथीच्या आजारांचे थैमान

Update: 2019-11-02 16:13 GMT

शहर व तालुका परिसरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यू, चिकन, गुनिया, गोचीड ताप या आजारांनी नागरिक त्रस्त झालेले दिसून येत आहेत. याबाबत सिल्व्हर ज्युबिली येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, बारामती शहरांमध्ये विषाणूजन्य आजार चे प्रमाण पाहता हे आजार होऊ नयेत म्हणून नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा तसंच पाणी साठवून जास्त काळ ठेवू नये. घराभोवती जर टायर असतील तर त्या टायरमध्ये पाणी साठवून राहिल्यास त्यातूनही डासांचा उपद्रव होऊन डेंग्यू हजार होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी ताप आल्यास त्वरित दवाखान्यात जावं रुग्णालयात रुग्णांना मोफत सोय आहे.

tsAppHack

tsAppHack

रुग्णाच्या प्लेटलेट्स पस्तीस ते चाळीस हजारपेक्षा कमी असल्यास आम्ही पुण्यातील ससून रुग्णालयात सदरचा रुग्ण पाठवत असतो. तेथे मोफत औषधोपचार केला जातो. चिकनगुनिया या आजाराबाबत डॉक्टरांना विचारले असता त्यांनी सांगितले की, गुरांच्या अंगावर जे किडे पिसवा सारखे असतात ते जर माणसाला चावले तर त्या पासूनही चिकनगुनिया सारखा आजार होत असतो.

सिल्वर जुबली चे वैद्यकीय अधिकारी डॉ. दशरथ चौरे यांनी गोचीड ताप होऊ नये यासाठी काय खबरदारी नागरिकांनी घ्यावी याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, गुरे किंवा जनावरांचे किंवा पाळीव प्राण्यांची किंवा भटक्या कुत्र्यांची विष्ठा जर घराभोवतालच्या परिसरामध्ये किंवा रस्त्यामध्ये असेल आणि चुकून त्यामध्ये जर माणसाचा पाय त्यामध्ये पडला तर त्यामुळे ही चिकनगुनिया सारखा आजार उद्भवू शकतो.

त्यामुळे नागरिकांनी गम बूट किंवा मोठे बूट वापरावे तसेच अंगावर ताप न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दरम्यान, पंचायत समिती येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खोमणे यांना बारामती शहरातील रुई या गावातील व परिसरामध्ये डायनामिक्स डेअरीच्या सांडपाण्यामुळे डेंग्यू चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, डायनामिक्स डेअरी कंपनी त्यांचे सांडपाणी रुई परिसरातील ओढ्यामध्ये सोडत होती ते सोडू नये म्हणून बारामती नगर परिषदेला लवकरात लवकर पत्राद्वारे आम्ही कळवणार आहोत.

तसेच डायनामिक डेअरीच्या मॅनेजर यांनादेखील डेअरी चे पाणी सांडपाणी ओढ्यामध्ये सोडू नये म्हणून त्यांना पत्र दिलेले आहे. तसंच नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसर स्वच्छ ठेवावा. तसंच पाणीसाठवण जास्त दिवस ठेवू नये व टायरमधील पाणी साठवणे.

पत्र्यावर पाणी साठले असल्यास ते होता स्वच्छ धुऊन काढावे. थंडी ताप आल्यास तो अंगावर काढतात परत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसंच आम्ही ग्रामीण भागामध्ये धुरळणी व परिसर स्वच्छता बाबत जनजागृती शासनामार्फत करत आहोत. त्यामुळे नागरिकांनीदेखील विषाणूजन्य आजार होऊ नयेत म्हणून दक्षता बाळगावी.

Similar News