मॅक्समहाराष्ट्रची टीम दी. बा. पाटलांच्या गावात, काय आहे गावकऱ्यांचं म्हणणं?

Update: 2021-06-26 14:15 GMT

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं गारूड संपूर्ण मराठी माणसाच्या मनावर असताना रायगड, नवी मुंबईच्या लोकांना दी.बा.पाटील यांच्या नावाचा अभिमान का वाटतोय? मॅक्समहाराष्ट्राने यासंदर्भात थेट दी.बा. पाटील यांच्या गावात जाऊन लोकांशी बातचीत केली. इथल्या प्रत्येक व्यक्ती दी.बा नसते तर आम्ही उपाशी मेलो असतो, दी.बा आमचे जीव की प्राण आहेत. आमची मुलं बाळं जी शिकतायत ती दीबा यांच्या मुळे.... असं सांगत दी. बा यांच्या कार्याविषयी माहिती दिली. तसंच जर दी. बा. पाटील यांचं नाव जर विमानतळाला दिलं नाही तर जासईच्या गावक-यांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

15 आगस्ट पर्यंत दीबांचे नाव विमानतळाला द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी इथल्या महिला, तरूण मुली, आणि तरूण गावकऱ्यांनी केली आहे. पाहा मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी गावकऱ्यांशी केलेली खास बातचीत

Full View
Tags:    

Similar News