ठरलं ! योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ निश्चित, भाजपची पहिली यादी जाहीर

भाजपची निवडणूकीची पहिली यादी जाहीर, कोण कुठून लढणार तर कोणाचा पत्ता झाला कट वाचा

Update: 2022-01-15 08:04 GMT


उ.प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुठून लढणार अशी चर्चा होती. पण आता भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दिल्लीमधून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. उ.प्रदेशातील निवडणूक सात टप्प्यांमध्ये होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५८ जागांवर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ५८ जागांवर मतदान होणार आहे. त्यानुसार भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील ५८ जागांपैकी ५७ जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यातील ५५ पैकी ३८ जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.



यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होती ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुठून लढणार याबाबत...योगी आदित्यनाथ यांना भाजपतर्फे अयोध्येमधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. पण अखेर भाजपने योगींना गोरखपूर मतदारसंघातून रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना प्रयागराज जिल्ह्यातील सिराधूमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उ.प्रदेशात भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्याने योगी आदित्यनाथ यांना अयोध्येमधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती.

योगी आदित्यनाथ यांचीही तिच इच्छा होती, असेही काही वृत्तपत्रांनी म्हटले आहे. अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू झाले असल्याने भाजप कार्यतर्त्यांमध्ये उत्साह निर्मितीसाठी अयोध्येमधून लढणं चांगले असेल असे योगी यांचे मत होते, असे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटवर देण्यात आले आहे. पण अखेर भाजपने योगींना गोरखपूरमधून निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

भाजपच्या इतर उमेदवारांची यादी

शामली - तजेंद्र सिंह निर्वाल

बुढ़ाना - उमेश मलिक

चरथावल - सपना कश्यप

पूरकाजी - प्रमोद ओटवाल

मुजफ्फरनगर - कपिल देव अग्रवाल

खतौली - विक्रम सैनी

मीरापुर - प्रशांत गुर्जर

सिवालखास - मनेंद्र पाल सिंह

सरदना - संगीत सोम

हस्तिनापुर - दिनेश खटीक

मेरठ कैंट - अमित अग्रवाल

किठोर - सत्यवीर त्यागी

मेरठ - कमलदत शर्मा

मेरठ साउथ - सोमेंदर तोमर

छपरउली - सहेंद्र सिंह रमाला

बड़ोत - केपी सिंह मलिक

बागपत - योगेश धामा

लोनी - नंदकिशोर गुर्जर

मुरादनगर - अजीत पाल त्यागी

साहिबाबाद - सुनील शर्मा

Tags:    

Similar News