प्रिय निलू बाळा म्हणत सुषमा अंधारे यांचा निलेश राणे यांच्यावर टीका

'निलू बाळा' अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार आणि भाजप नेते नीलेश राणे यांना केली आहे.

Update: 2023-03-12 07:41 GMT

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका करताना नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी बारामतीची खासदारकी बदलावी लागेल, अशी टीका केली होती. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ट्विट करत राणेंना प्रत्युत्तर दिले. सुषमा अंधारे म्हणाल्या प्रिय निळू बाळा, तुम्ही एवढ्या कळकळीने लिहिलं म्हणून केंद्रात भाजप (BJP) आलं आणि हिंदुत्वाचा दावा करत ईडीचं सरकार राज्यात आलं. तरीही शिवसेना (Shiv Sena) भवनासमोर हिंदुत्वासाठी निषेध मोर्चा काढला तर. याचा अर्थ सध्याचे सरकार हिंदुत्वविरोधी आहे. मग ते बदलण्याची गरज नाही का? बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न न सुटल्यास आम्ही आंदोलन करू, या सुप्रिया सुळे यांच्या इशाऱ्यावर नीलेश राणे यांनी टीका करत ते म्हणाले, "या ठिकाणी 6 पैकी 2 आमदार राष्ट्रवादीचे आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) हे अनेकवेळा पालकमंत्री राहिले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) हे स्वतः बारामतीचे किम जोंग आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. हे असुन देखील आंदोलने करायची असतील तर बारामतीचे खासदार बदलावे लागतील. नीलेश राणेंच्या वक्तव्य केले आणि त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress) सरचिटणीस अदिती नलवडे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून निलेश राणेंच्या ट्विटरवर (Twitter) टीका केली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी नीलेश राणेंना 'ज्युनियर थापा' असे संबोधले. तसेच सुप्रिया सुळे यांचा अभिनय व्हिडीओतील निलेश राणेंपेक्षा अधिक प्रभावी आहे.

Tags:    

Similar News