"अजितदादा मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत", संजय राऊत यांचा सूचक इशारा

Update: 2021-09-26 11:30 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि ते लगेचच मुंबईला यायला निघाले आहेत. पण या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली आहे. पण यावरुन शिवसेनेनं आपला सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

पिंपरी चिंचवडमधील पदाधिकारी मेळाव्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना चिमटे काढले आहेत. पालकमंत्री आपले नाहीत, पण राज्यात आपली सत्ता आहे, इथे आपले कोणी ऐकत नाही असं का म्हणता. मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्रीसुद्धा आपलेच आहेत. त्यांनी नाही ऐकलं तर मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आज, त्यांना सांगावे लागेल हे..... असा टोला लगावला आहे. एवढेच नाही तर संजय राऊत यांनी राज्यात महाविकासआघाडी आहे तर महापौर पदाची इच्छा झाली तर त्यात चुकीचे काय, असा सवालही राऊतांनी विचारला. तसंच आले तर सोबत नाहीतर एकटे लढू, आपण सगळ्या उमेदवारांची तयारी करू, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. एकूणच संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या बाबतीत राष्ट्रवादी इशारा दिलाच आहे. पण अजित पवारांनाही सूचक इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे.

Tags:    

Similar News