शिक्षक भरती घोटाळ्यात सहभागाच्या आरोपावर सत्तार यांचे उत्तर

Update: 2022-08-08 07:33 GMT

राज्याला हादरवून टाकणाऱ्या शिक्षक भरती घोटाळ्यात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. पण अब्दुल सत्तार यांनी सर्व आरोप फेटाळले असून या प्रकरणाची चौकशी करुन दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणात सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षामध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणात काही अधिकाऱ्यांना अटकही झाली आहे. यामध्ये सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावं आली आहे आणि त्यांना एजंटमार्फत पैसे देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे, असा आरोप होतो आहे. याप्रकरणी आमदार अब्दुल सत्तार यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. एवढेच नाही तर सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Full View


Similar News