कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मोठा झटका, प्रशांत किशोर यांनी साथ सोडली...

Update: 2021-08-05 07:05 GMT

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मोठा धक्का बसला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे राजकीय सल्लागार पी. के.. अर्थात निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची जवळीक वाढली आहे. त्यातच कॉंग्रेस नेतृत्व कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळंच प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. आगामी काळात प्रशांत किशोर यांच्याकडे कॉंग्रेस पक्षात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Full View

कॉंग्रेस नेतृत्वाने आगामी निवडणूकांसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून नवज्योत सिंह सिद्धू यांची निवड केली आहे. प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची जवळीक आणि प्रशांत किशोर यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या सल्लागार पदाचा दिलेला राजीनामा काही कनेक्शन आहे का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

राजीनाम्याचं कारण काय?

प्रशांत किशोर यांनी आपल्या पत्रात वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

"सार्वजनिक आयुष्यापासून काही काळ दूर राहण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मुख्य सल्लागार पदाची कामं करण्यासाठी मी सक्षम नाही. मला माझ्या भविष्यातील वाटचालींबद्दलही निर्णय घ्यायचा असून, मी आपल्याला विनंती करतो की, मला या जबाबदारीतून मुक्त करावे"

असं प्रशांत किशोर यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

Tags:    

Similar News