OBC आरक्षण डाटा सदोष : रस्त्यावर उतरु: फडणवीस

Update: 2022-06-13 13:52 GMT

ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत‌(OBC reservation) इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची पद्धत सदोष आहे.सरकारला आजच सांगतो तुमचे आकडे आणि सर्व्हे चुकत आहेत. दुरुस्ती करा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल‌ असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला दिला. फडणवीस मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अनेक वेळा आडनावे वेगवेगळी असतात. आता जो सर्व्हे केला जात आहे त्यात ओबीसींची संख्या मोठ्या प्रमाणात घटेल असे दिसत आहे. मी आज आकडेवारी सांगत नाही. पण लवकरच सांगणार आहे. सरकारला आजच सांगतो तुमचे आकडे आणि सर्व्हे चुकत आहेत.

मध्यप्रदेश सरकारने एका एका जिल्ह्याचा सर्व्हे केला होता. मात्र, इथे कुणी लक्ष देत नाही. सरकारने तात्काळ चौकशी करावी, अन्यथा मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. छगन भुजबळ हे प्रयत्न करत आहेत यात शंका नाही, पण सरकारमध्ये मंत्र्यांची क्षमता त्या पलीकडे ते काही करू शकत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यामध्ये लक्ष घातले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. एकदा हे सर्वेक्षण पूर्ण होऊन, न्यायालयात सादर झाले की मग त्यातून माघार घेता येणार नाही. ओबीसींचे कायमस्वरूपी आणि मोठे नुकसान झालेले असेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

विधनपरीषद निवडणुकीवर बोलताना फडणवीस म्हणाले,सत्ताधारी पक्षाने माझ्याशी चर्चा केली होती. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र, काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही. आता पाचवी जागा आम्ही निश्चित जिंकू, असा दावा फडणवीस यांनी केला. मी फार जास्त बोलत नसतो. मला विश्वास आहे, आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल. आम्ही पक्षीय पातळीवर चर्चा केली, त्यामुळे आम्ही सहावी जागा न लढवण्याचा निर्णय घेतला असे ते‌ शेवटी म्हणाले.

Tags:    

Similar News