अधिकारी संपावर पण गारपिटीच्या पंचनाम्यासाठी अब्दुल सत्तार यांनी काढला मार्ग

Update: 2023-03-20 08:30 GMT

राज्यात शेतकऱ्यांना गारपिटीचा मोठा फटाका बसला आहे. मात्र शासकीय कर्मचारी संपावर असल्याने पंचनाम्याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मार्ग काढला आहे.

गेल्या चार दिवसांपासून राज्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावर विरोधी पक्षाने चर्चेची मागणी केली. याबाबत मंत्री कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पंचनामा करण्याबाबत शासन मार्ग काढत असल्याचे म्हटले आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, मी बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. मात्र सध्या शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने पंचनाम्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट नुकसानीचा फोटो काढून जरी पाठवला तरी त्यातून नुकसानीचा आकडा समजण्यास मदत होईल, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

Tags:    

Similar News